ध्येय आणि उद्दिष्टे

कृषी गट निर्मिती

शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहारात आवश्यक त्या सेवा पुरवत असतानाच समान पीक लागण आणि भौगोलिक अनुकू लता लक्षात घेत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी कृषी गट निर्मिती करणे आणि आधीच अस्तित्वात असलेल्या गटांना तंत्रज्ञानाने जोडणे


उपलब्ध शेतकरी गटांमधील जमिनीचे परीक्षण करून गटातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रोक्त कृती आराखड्याच्या माध्यमातून पीक उत्पादन पद्धती, खतांचा योग्य प्रमाणात वापर करण्याच्या पद्धतीतज्ञाच्या मार्फ त पोहोचवणे आणि जमिनीचा पोत सांभाळून उत्पादन क्षमता वाढवणे 


गटांच्या माध्यमातून बियाणे,निविष्ठा आणि सर्व घटक एकत्रित खरेदी करून /तयार करून तसेच एकत्रित मनुष्यबळ वापरून उत्पादन खर्च कमी करणे

कृषीगटांना बाजाराशी जोडणे

तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारातील मागणीची माहिती वेळोवेळी कृषी गटांना पुरवणे तसेच पीक उत्पादन,जलव्यवस्थापन,पीक विमा आदि योजनांच्या विविध माध्यमांसोबत कृ षी गटांना जोडणे 


गटाची उत्पादने स्थानिक वाहतूक आणि  मनुष्यबळ यांचा वापर करून बाजार, प्रक्रिया उद्योगापर्यंत पोहोचवणे


बाजारातील मागणीनुसार पीक पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांच्या गटाला थेट बाजार,प्रकिया उद्योगासोबत जोडणे आणि कृ षीगटाच्या नफ्यात वाढ करणे

शेतमाल गुणवत्ता प्रमाणीकरण

गटाच्या माध्यमातून शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून पिकवलेल्या शेतमालाचे blockchain traceability सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता प्रमाणीकरण करून घेणे आणि या प्रमाणीकरणाची माहिती अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवणे


गुणवत्ता प्रमाणीकरणाच्या दरम्यान रासायनिक आणि सेंद्रिय कृ षी उत्पादने यांच्यामधील अंतर traceability च्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचवून सेंद्रिय कृ षी उत्पादनांना चालना देण्याचा प्रयत्न करणे