हरित गृह

या गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला आपल्या परिसरातील इतर हरित गृह,पॉली हाऊस धारकांसोबत जोडले जाता येईल.नियंत्रित वातावरणात उत्पादन घेण्याचे फायदे तसेच विविध शासकीय योजना आणि अनुदाने यांचे पर्याय खुले करून देण्यात येतील.

हरित गृह सिंचन पद्धती, वातावरण नियंत्रण , फवारण्या तसेच पॉली हाऊस उभारणीच्या कामात तज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून सेवा प्रदाता उद्योगांना जोडून कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळवण्याचा कृ ती आराखडा दिला जाईल.

संसाधने बचत आणि कार्यक्षमता वाढीसाठी आधुनिक hydroponic सारख्या तंत्रज्ञानाचा वापर सेंद्रिय खतांच्या वापराने प्रोत्साहित के ला जाईल. याच तंत्रज्ञानाच्या वापराने चारा आणि पशुखाद्य निर्मिती शास्त्रोक्त पद्धतीने करून देण्याचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यात येईल

कृ षी गट उत्पादने विक्री च्या माध्यमातून सर्व उत्पादने आणि पशुखाद्य थेट बाजारात विकण्याचा पर्याय खुला होईल.