पीक व्यवस्थापन गट

या गटाचा सदस्य होऊन शेतकऱ्याला पीक व्यवस्थापन,खते,फवारणी,मातीमधील घटक,कीड व रोगराई तसेच हवामान अंदाज इ गोष्टींबाबत शास्त्रोक्त माहिती देत प्रत्यक्ष तज्ञ भेटीतून वर्तमान आणि भविष्यातील उपलब्ध पर्याय समोर ठे वण्यात येतील तसेच जमिनीचा पोत सांभाळून उत्पादन कसे वाढवावे याबद्दल मार्गदर्शन के ले जाईल.

या गटाचा सदस्य होण्याआधी शेतकऱ्याला समान पीक लागण गटाचा सदस्य होणे अनिवार्य असल्याने पीक लागण आणि कापणी कालावधी (अंदाजे) यांची माहिती उपलब्ध असेल.

या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात नोंदणीकृ त जमिनीच्या मातीचे प्रयोगशाळेत परीक्षण करून मातीतील नत्र ,स्फु रद,पालाश,मातीचा सामू आणि इतर घटकांची तपासणी के ली जाईल. त्यायोगे जमिनीची प्रतवारी तसेच भौगोलिक अनुकू लता लक्षात घेऊन भविष्यातील कृ ती आराखडा निश्चित के ला जाईल.

दुसऱ्या टप्प्यात कृ षी तज्ञ थेट बांधावर भेट देतील आणि आधीच्या माहितीआधारे शेतकऱ्यासोबत वार्ता करून शास्त्रोक्त कृ ती आराखडा तसेच भविष्यातील उत्पादनवाढीचे पर्याय यांबद्दल मार्गदर्शन करतील.

अंतिम टप्प्यात शेतकऱ्याची अनुकू लता लक्षात घेत त्याला इतर कृ षी गटांचा सदस्य होऊन उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी प्रोत्साहित के ले जाईल.