सेंद्रिय शेती

या गटाचा सदस्य होणाऱ्या शेतकऱ्याला पूर्णपणे सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रथम त्याच परिसरातील इतर सेंद्रिय शेती करण्यासाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांसोबत जोडले जाईल. सेंद्रिय शेतीचा कृ ती आराखडा आणि सर्व प्रक्रिया app द्वारे वेळोवेळी पुरवल्या जातील. सर्व सेंद्रिय खते आणि औषधे सामायिकीकरण याबद्दल सूचना पुरवल्या जातील

या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्याला PGS - Green,PGS -Organic सारख्या योजनांमध्ये जोडले जाईल तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या PGS मानांकित गटांची सुद्धा नोंद के ली जाईल.

दुसऱ्या टप्प्यात सेंद्रिय खते,कीडनाशक,सापळे,निविष्ठा(जीवामृत ,पंचगव्य, दशपर्णी , कडुलिंब अर्क ) इ घटक स्थानिक पातळीवर तयार करण्याच्या पद्धती पोहोचवून याचे उत्पादन गटाने करण्यासाठी कृ ती आराखडा देण्यात येईल.

गटाने निर्माण के लेली उत्पादने गुणवत्ता प्रमाणीकरणासह कृ षी गट उत्पादने विक्री गटाच्या माध्यमातून बाजाराशी जोडली जातील आणि प्रत्येक गटाला सेंद्रिय खत,निविष्ठा उत्पादन करून सेवा प्रदाता म्हणून इतरांना विक्रीचा पर्याय देखील खुला होईल .