सिंचन व्यवस्था
या गटाचा सदस्य झाल्याने शेतकऱ्याला उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माहितीची नोंद करून भविष्यातील जलनियोजन कृ ती आराखडा मिळवता येईल.
या गटाच्या माध्यमातून नदी,विहीर,कू पनलिका यापैकी उपलब्ध स्रोताचे प्रयोगशाळेत जलपरीक्षण करून तसेच जमिनीची प्रतवारी जाणून (क्षारपड,डोंगर उतार ,निचरा प्रमाण,सक्षम इ ) कोणत्या प्रकारची सिंचन व्यवस्था,प्रमाण घेणे सयुक्तिक ठरेल याची निरीक्षणे नोंदवली जातील.
क्षारपड जमीन सक्षम व्हावी,सक्षम जमीन क्षारपड होऊ नये म्हणून जल वापराचे निश्चित प्रमाण सूचित के ले जाईल तसेच डोंगर उतारावर आणि जास्त प्रमाणात निचरा होणाऱ्या जमिनीत hydroponic सारखे पर्याय वापरून योग्य जलनियोजन साध्य करण्याचा प्रयत्न के ला जाईल.
विहीरीचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जलस्रोत पुनरुज्जीवीत करण्यासाठी शास्त्रोक्त पर्याय उपलब्ध के ले जातील तसेच कू पनलिका खोदू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पाणी परीक्षण, कू पनलिका खुदाई यंत्रणा यांची माहिती दिली जाईल आणि उपलब्ध कू पनलिकांच्या जलपुनर्भरण(Rainwater Harvesting ) प्रक्रिया समजावल्या जातील